Kishor Aware Death Case Update: किशोर आवारे हत्या प्रकरण, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 4 जणांना केली अटक

Latest News: किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Kishor Aware Death Case
Kishor Aware Death Case saam tv

Pimpari- Chinchwad News: पुण्यातील (Pune) मावळमध्ये भरदिवसा मुळशी पॅटर्न स्टाईलने जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या (Kishor Aware Murder Case) करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. आता या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Kishor Aware Death Case
Mumbai News: मुंबईत 52 लाखांचे अमली पदार्थ जप्त, BMS च्या विद्यार्थ्याला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) मुख्य चार आरोपींना अटक केली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींना आज वडगांव मावळातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Kishor Aware Death Case
Maharashtra chi HasyaJatra: माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं की तुझ्या डोळ्यात.. लग्नाच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा

किशोर आवारे यांच्यावर तळेगाव पालिकेच्या कार्यालयासमोर (talegaon dabhade muncipal council office) शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी पालिका कार्यालयात आले होते. मुख्याधिकारी यांची भेट घेऊन ते बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर हल्ला केला. यामधील दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला तर दोघांनी कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर आवारे यांच्या कुटुंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com