'सामान्य मुंबईकरांचे पैसे लुटणारे...'; किशोरी पेडणेकरांचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
Kishori pednekarSaam tv

'सामान्य मुंबईकरांचे पैसे लुटणारे...'; किशोरी पेडणेकरांचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर

Kishori pednekar News : देवेंद्र फडणवीसांनी सभेत शिवसेनेवर केलेल्या टीकेला नेत्या किशोरी पेडणेकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी सभा आयोजित केली. या सभेतून भाजप नेते आशीष शेलार यांनी मुंबईतील शिवसेनेच्या कारभारावर तोफ डागली. शिवसेनेच्या कथित घोटाळ्यांची माहिती भर सभेत सांगितली. शेलारांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही शिवसेनेला डिवचलं. याच सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) तुफान बरसले. देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या, बाबरी मशीद, हिंदुत्व या सर्वच मुद्यावरील आरोपांना उत्तर देत शिवसेनेवर चौफेर फटकेबाजी केली. आजच्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सभेत शिवसेनेवर केलेल्या टीकेला मुंबईच्या माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'उद्धव ठाकरेसाहेब लॉफ्टर शो कधीच करत नाही, मात्र भाजपची उत्तर पूजा मुंबईकर नक्कीच करणार आहे. सामान्य मुंबईकरांचे पैसे लुटणारे मंगल प्रभात लोढा(Mangal Prabhat Lodha ) भाषण देत आहे, असा खणखणीत टोला पेडणेकरांनी भाजपला लगावला. ( Ex mayor kishori pednekar has criticized bjp over Devendra Fadnavis Allegations )

 Kishori pednekar
उंदरांनाही सोडत नाहीत हे कसले वाघ; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. या देशाचे वाघ केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. आता देवेंद्र फडणवीसांची सभा झाल्यानंतर शिवसेना नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपनं शिवसेनेवर केलेल्या आरोपावरून किशोरी पेडणेकर म्हणाल्या,'उद्धव ठाकरेसाहेब लॉफ्टर शो कधीच करत नाही, मात्र भाजपची उत्तर पूजा मुंबईकर नक्कीच करणार आहे. सामान्य मुंबईकरांचे पैसे लुटणारे लोढा आज भाषण देत आहे. भाजप मुंबईला केंद्रशासित करण्याचे स्वप्न पाहत आहात, ते कधीच पूर्ण होणार नाही. आमचे हिंदुत्व हे हाताला काम पोटाला भाकरी देणारे आहे. भाजपनं घेतलेली आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावण्यासाठी होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही आणि तेच आज हिंदीत बोलले, असे जोरदार प्रत्युत्तर माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी भाजपला दिले.

हे देखील पाहा -

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला 'हा' इशारा

दरम्यान, आजच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी अयोध्या, बाबरी मशीद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला. या सभेत फडणवीस म्हणाले, 'होय आज माझं वजन १०२ आहे. बाबरी मशीद पाडायला जाताना १२८ किलो होते. उद्धव ठाकरे हे पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले आहे. हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com