किशोरी पेडणेकर महापौर बंगला सोडणार; जुन्या ५५० चौ. फुटांच्या घरात होणार शिफ्ट

Kishori Pednekar Will Shift In Old House : येत्या १० मे पर्यंत सदर बंगल्यातील सर्व सामान त्या आपल्या जुन्या घरी शिफ्ट करून पुढे त्याच घरात राहायला जाणार आहेत.
किशोरी पेडणेकर महापौर बंगला सोडणार; जुन्या ५५० चौ. फुटांच्या घरात होणार शिफ्ट
Kishori Pednekar will leave a mayor bungalow; will be shift in the Old house of 550 Sq. feetSaam Tv

मुबंई: मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर हे मुबंईतील महापौर निवासस्थान सोडणार आहेत. मुंबईच्या राणी बागेत (Ranibaug) महापौर निवासस्थान (महापौर बंगला) आहे. आता हे निवासस्थान सोडण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेची मुदत संपली असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. हा बंगला सोडल्यानंतर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या आपल्या मुंबईच्या लोवर परळ या जून्या घरात राहायला जाणार आहेत. (Kishori Pednekar will leave a mayor bungalow; will be shift in the Old house of 550 Sq. feet)

हे देखील पाहा

२२ नोव्हेंबर २०१९ मध्ये किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. ७ मार्च २०२२ ला १४ व्या मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आली. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. प्रशासक नेमून दोन महिने उलटले आहेत त्यामुळे निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे काळजीवाहू म्हणून काम करत असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर राणी बागेतील महापौर निवस्थानीच रहात होत्या. आता पालिकेचं हे शासकीय निवासस्थान सोडून पेडणेकर आपल्या लोवर परळ मधील घरी राहायला जाणार आहेत. लोवर परळमधील सनमिल कंपाउंडमधल्या इमारतीतील जुन्या ५५० चौ. फुटाच्या घरात शिफ्ट करायला सुरुवात केली आहे. येत्या १० मे पर्यंत सदर बंगल्यातील सर्व सामान त्या आपल्या जुन्या घरी शिफ्ट करून पुढे त्याच घरात राहायला जाणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.