
पुणे : जगभरात आज महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक महिला आता संघर्ष करून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आज जगभरात महिला या मोठमोठ्या पदावर विराजमान होत आहेत. तर काही महिला सामाजिक कार्य करून समाजात योगदान देत असतात. असंच समाज कार्य करणाऱ्या एका महिलेचं कौतुक होत आहे.
काही वर्षांपूर्वी स्त्री म्हटलं की, चुल आणि मुल याशिवाय तिला संसार नसायचा. आता काळानुरुप अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. स्रियांना शिक्षणाची मूभा मिळाली आणि त्यांनी पाखरासारखी आभाळी झेप घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्त्रिया आता समाजकार्यातही जोमाने उतरत आहेत. अनेक महिला या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलत आहेत. अशाच एका महिलेबद्दल जाणून घेऊयात.
आज जागतिक महिला दिन (Womens Day) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातली 'न्यूज पेपर बॅग वुमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारती भिमराव पाटील या गृहिणी महिलेने पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेतलेल्या मोहीमेबद्दल माहिती देणार आहोत.
दैनंदिन जीवनातील प्लास्टिक बॅगचा उपयोग टाळण्यासाठी भारती पाटील यांनी रद्दीत पडलेल्या वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्यांची निर्मिती केली आहे. भारती पाटील यांनी मागील दोन वर्षात जवळपास 5000 च्या वर कागदी पिशव्या तयार करून, त्या पिशव्या आपल्या सोसायटीमधील रहिवाशांना, तसेच भाजीपाला - फळ विक्रेत्यांना मोफत वितरित केल्या आहेत.
दैनंदिन जीवनात प्लास्टिक पासून होणारा कचऱ्याला आळा घालण्यासाठी भारती पाटील यांनी रद्दीत पडलेल्या वृत्तपत्रांपासून कागदी पिशव्या तयार केल्या आहेत. प्लास्टिक बॅगचं पर्यावरण पूरक पद्धतीने विघटन होत नसल्याने त्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्मिती होते.
त्यामुळे प्लास्टिक बॅगना मापक दरात परवडणाऱ्या पर्यायी पिशव्या देण्यासाठी भारती पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. भारती पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरामध्ये काही प्रमाणात का होईना प्लास्टिक बॅगच्या वापराला आळा बसला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.