कोकणवासीयांसाठी शिवसेना, मनसे तर्फे मोफत बस सेवा...

आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील कोकणवासीयांसाठी राजकारण्यांनी गणेशभक्तांसाठी बससेवा सुसाट सोडल्या आहेत.
कोकणवासीयांसाठी शिवसेना, मनसे तर्फे मोफत बस सेवा...
कोकणवासीयांसाठी शिवसेना, मनसे तर्फे मोफत बस सेवा... प्रदीप भणगे

डोंबिवली : आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील कोकणवासीयांसाठी राजकारण्यांनी गणेशभक्तांसाठी बससेवा सुसाट सोडल्या आहेत. यामागे प्रभागातील मतांची टक्केवारी काढली जाणार असून, जास्तीत जास्त चाकरमानी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. कोरोनामुळे आणि कडक निर्बंधांमुळे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा गणेशोत्सव सण चाकरमान्यांना गावच्या घरी साजरा करता आला नव्हता.

यावर्षी कोरोनाचे संकट कमी असून, निर्बंधही शिथिल असल्याने काही करून गावच्या घरी गणेशोस्तव साजरा करण्याचा निर्धार चाकरमान्यांनी केला आहे. मनसेने रेल्वे प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यामुळे दिवा स्थानकातुंन कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. तर एसटी महामंडळानेही अतिरिक्त बसेसची सुविधा देऊ लागली आहे.

हे देखील पहा-

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षानी हाती मिळालेल्या संधीचा फायदा उचलत यानिमित्ताने घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेने कडून मोफत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या माध्यमातून काहिसा मदतीचा हात म्हणून सामान्य कोकणवासियांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी या ठिकाणी गणेशउत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकूण २०० मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण कोकणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहे.

कोकणवासीयांसाठी शिवसेना, मनसे तर्फे मोफत बस सेवा...
Ganpati Festival | गणपतीसाठी रेल्वेकडून कोकणवासीयांसाठी 150 वाऱ्या ; पाहा व्हिडिओ

डोंबिवलीत मनसेने सुद्धा मोफत सेवा कोकणवासीयांना उपलब्ध करून दिली. कोकणातील 11 ठिकाणी या बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मनसे आमदार यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या दिवा रत्नागिरी पॅसेंजरला आमदार आणि स्टेशन मास्तर याच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी प्रवाश्यांना १६०० अल्पोपहाराचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी त्यांच्या सोबत कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर साहेब, हर्षद पाटील, संतोष पाटील विभाग अध्याक्ष तुषार पाटील व दिवा विभाग पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसेचे आमदार यांचे जेष्ठ नागरिक आणि महिला वर्गाने आभार मानले. दिवा येथे भाजपाचे निलेश पाटील यांच्या वतीने अल्प दरात लक्झरी बससेवा उपलबद्ध करून देण्यात आली आहे. मात्र, केवळ प्रभाग क्र. 27 मधील रहिवाशांसाठी ही सेवा देऊ केली आहे. दिवा ते माणगांव, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखांबा, पाली, लांजा, ओणी, राजापूर, खारेपाटण, तरळे, नांदगाव, कणकवली, कसाल, कुडाळ आणि सावंतवाडीसाठी ही सेवा आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com