कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी

यशस्वी चाचणी झाल्याचे पाहून मेट्रो प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे
कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी
कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वीSaam Tv

पुणे - पुणेकरांना मेट्रोतून Pune Metro लवकर प्रवास करता यावा, यासाठी मेट्रो प्रशासनाकडून जलदगतीने काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून काल ८ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास कोथरूड Kothrud येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर Anand Nagar अशा ३ कोचची मेट्रो रुळावरून धावली. ही मेट्रोची Metro अंतर्गत चाचणी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ही चाचणी झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. हे व्हिडिओ खरंच कोथरूडमधील चाचणीचे आहेत काय? याची खात्री करण्यासाठी पुणेकर एकमेकांकडे विचारणा करत होते. कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी परिसरात काल रात्री १०.३०च्या सुमारास मेट्रोची चाचणी करण्यात आली.

कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी
भारतीय ऑलिंपिकपटूंना १७ जुलै पूर्वी टोकियोत प्रवेश नाही

अनेकांनी मेट्रोचे ट्रायल सुरू आहे असे व्हिडिओ व्हायरल केले होते. परंतु ती अंतर्गत चाचणी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत. व्हिडिओची खात्री पटल्यानंतर पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे. आता लवकरच मेट्रोतून प्रवास करायला मिळेल, अशी अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केली आहे. यशस्वी चाचणी झाल्याचे पाहून मेट्रो प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे मेट्रो आता लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com