Nagar News : दुचाकी मालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; दहा लाखांच्या 21 दुचाकी कोतवाली पोलिसांकडून परत

लाखो रुपयांच्या दुचाकी नागरिकांना मिळाल्याने उपस्थितांनी कोतवाली पोलिसांच्या या कामाचे कौतूक करून आभार मानले.
kotwali police station, nagar news
kotwali police station, nagar newssaam tv

- सुशिल थोरात

Nagar News : कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात बर्‍याच वर्षांपासून पडून असलेल्या दहा लाख किंमतीच्या 21 दुचाकी मूळ मालकांच्या हवाली करण्यात आल्या. चोरी, अपघातातील दुचाकी परत मिळाल्याने मूळ मालकांनी कोतवाली पोलिसांचे (kotwali police) आभार मानले. कष्टाच्या पैशाने घेतलेली दुचाकी परत मिळाल्याने काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. (Maharashtra News)

kotwali police station, nagar news
Maharashtra Gram Panchayat By Election: कडक उन्हाळ्यात गावगाड्याचे राजकारण तापणार; थेट सरपंच पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर

कोतवाली पोलिस ठाण्यात बर्‍याच दुचाकी अनेक वर्षांपासून पडून होत्या. ऊन, वारा, पावसामुळे दुचाकींचे नुकसान होत होते. त्यामुळे या दुचाकींचे रेकॉर्ड काढून मूळ मालकांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले होते.

kotwali police station, nagar news
Video पाहा : महाराष्ट्रात Corona चा विळखा; Pandharpur च्या विठुरायाच्या दर्शनाला निघालात ? थांबा ! नवा नियम वाचा

कोतवालीच्या पोलिस कर्मचार्‍यांनी दुचाकींचे चेचीस नंबर, वाहन क्रमांक यावरून मूळ मालकांचे पत्ते शोधून काढले आणि त्यांना संपर्क केला. मूळ मालकांना दुचाकी घेऊन जाण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.

दुचाकी कोणास न विकणे, दुचाकीत कोणता बदल न करणे, वेळोवेळी पोलिस तसेच न्यायालयाकडून बोलावणे आल्यास हजर राहणे या सर्व अटींवर दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.

लाखो रुपयांच्या दुचाकी नागरिकांना मिळाल्याने उपस्थितांनी नगरच्या कोतवाली पोलिसांच्या या कामाचे कौतूक करून आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com