पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' !

पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात तीन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' !
पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' ! SaamTv

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात तीन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ माजली होती. 'Koyata Bhai' in Pimpri-Chinchwad!

हे देखील पहा -

पिंपरी-चिंचवड परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, पिंपरी चिंचवड आणि औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी आटोक्यात येताना दिसत नाही.

आता त्याच परिसरात पुन्हा एक नवा 'कोयता भाई' उदयास आला आहे. या कोयता भाईचे हातात कोयता घेऊन प्रदर्शन करतानाचे विडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यम भाई सरोदे अस या कोयता भाईचे नाव असून. त्याने हातात कोयता घेऊन स्वतःला गुन्हेगार आणि भाई म्हणवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले आहेत.

पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' !
पिंपरी - चिंचवडमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड

यम सरोदे हा टुकार गुंड पिंपरी-चिंचवड शहराच्या स्पाईन रोड परिसरातील त्रिवेनिंगर भागात राहतो. यम भाईने हातात कोयता घेऊन व्हिडियो काढल्यामुळे यम भाईची परिसरात चांगलीचं दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखली पोलिस यम भाईला बेड्या टोकून त्यांची दहशत मोडून काढतात का याकडे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com