मलंगगड आणि परिसरात ललिता पंचमी उत्साहात साजरी...

ललिता पंचमीचे औचित्य साधून कल्याण जवळील असलेल्या मलंगगडावर दरवर्षी पायी वारकरी दिंडी काढण्यात येते.
मलंगगड आणि परिसरात ललिता पंचमी उत्साहात साजरी...
मलंगगड आणि परिसरात ललिता पंचमी उत्साहात साजरी...प्रदीप भणगे

कल्याण: ललिता पंचमीचे औचित्य साधून कल्याण जवळील असलेल्या मलंगगडावर दरवर्षी पायी वारकरी दिंडी काढण्यात येते. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या परंपरा आज देखील स्थानिकांनी जपल्या आहेत. रविवारी झालेल्या ह्या दिंडीच्या आयोजनामुळे संपूर्ण मलंगगड परिसर 'जय हरी विठ्ठल', 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या जयघोषात दुमदुमुन गेला. तसेच भजन-कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले. (Lalita Panchami celebrated in Malanggad and surrounding areas)

मलंगगड आणि परिसरात ललिता पंचमी उत्साहात साजरी...
हेदुटणे गावाजवळ भलामोठा होर्डिंग कोसळला; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...

ह्या दिंडीचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जात असते. ललिता पंचमीला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे आणि ठाणे,रायगड जिल्ह्यातील वारकरी हे मलंगगडावर आरतीसाठी जात असत. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे फक्त १० वारकऱ्यांना आरतीची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com