दरड कोसळण्याच्या घटनांना भूमाफिया जबाबदार - प्रवीण दरेकर

काल कळवा येथील घोलाई नगर परिसरात घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली.
दरड कोसळण्याच्या घटनांना भूमाफिया जबाबदार - प्रवीण दरेकर
दरड कोसळण्याच्या घटनांना भूमाफिया जबाबदार - प्रवीण दरेकर कल्पेश गोर्डे

कल्पेश गोर्डे

मुंबई : काल कळवा येथील घोलाई नगर परिसरात घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या सोबत भाजप आमदार संजय केळकर आणि भाजप अध्यक्ष निरंजन डावखरे उपस्थित होते. Land mafia responsible for landslides - Pravin Darekar

हे देखील पहा -

त्यांनी या 2 जखमी तरुणींची विचारपूस केली. तसेच ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे सांगत अगदी निरागस बालिका जखमी झाली असून त्याचे कुटुंबीय मृत झाल्याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नसल्याने मन हेलवणारी घटना घडली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत विक्रोळी, चेंबूर, भांडुपला अशा घटना घडल्या त्याला जबाबदार भूमाफिया असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी केला आहे. ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी बांधकाम करताना व परवानगी देताना त्या वेळी तिथे संबंधित अधिकारी कोण होते? याची माहिती घेऊन त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावावा अशी मागणी यावेळी भाजप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरड कोसळण्याच्या घटनांना भूमाफिया जबाबदार - प्रवीण दरेकर
महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास

या घटना घडल्या आहेत त्याचा मी आणि देवेंद्र फडणवीस निश्चित पाठपुरावा करू असे ही ते म्हणाले. अशा प्रकारच्या प्रवृत्ती ठेचल्या नाहीत तर अशा घटना घडतच राहतील. त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अकस्मात घटनेचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आम्हाला जे लोक जबाबदार वाटतील त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी किंवा तोंडी तक्रार देऊन गुन्हे दाखल करू अशी तंबी यावेळी भाजप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com