VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!

घरभाडे मागायला आलेल्या घरमालकाच्या मुलाला भाडेकरूने चक्क चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे.
VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!
VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!SaamTv

पुणे : घरभाडे मागायला आलेल्या घरमालकाच्या मुलाला भाडेकरूने चक्क चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत सौरभ पोरे हा घरमालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सौरभ पोरे यांच्या मालकीच्या असलेल्या इमारतीत विजय पाटोळे हे आपल्या कुटुंबासह भाडयाने राहतात.

पाटोळे यांच्याकडे आठ महिन्याचे भाडे मागण्यासाठी घरमालक आणि त्यांचा मुलगा सौरभ पोरे गेला असता भाडेकरू असलेल्या पाटोळे कुटुंबियांना त्याचा राग आला व त्यांनी सौरभ पोरे याला इमारतीच्या टेरेस वर बोलावून धक्काबुक्की व शिवीगाळ करत टेरेस वरून खाली ढकलून दिले.

VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!
Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार

या घटनेत सौरभ पोरे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी भाडेकरू विजय पाटोळे, त्याची पत्नी व मुलगा साहिल पाटोळे या कुटुंबावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com