भारतनगर चेंबूर : 25 कुटुंबांचे बीएमएसीने केले स्थलांतर

mumbai rain update
mumbai rain update

mumbai rain update मुंबई : मुंबईतील बहुतांश भागात शनिवार रात्रीपासून जाेरदार पाऊस पडत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. पावसामुळे रेल्वे सेवेला खाे बसला आहे. (landlside-chembur-11-died-mumbai-rain-update-vikroli-andheri)

मुंबईतील चेंबूर भागातील भारतनगर येथे दरड काेसळली आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु झालेले आहे. या घटनेत पाच घरांवर दरड काेसळली आहे. मुंबईत विक्राेळीत देखील दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान मुंबईतील दुर्देवी घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत राजावाडी आणि शतबादी रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरु हाेते. यामध्ये नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीआरएफचे पथकाने बजाव कार्य सुरुच ठेवले आहे.

संसार उद्धवस्त झाला; मदत लगेच द्या

मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागातील रहिवशांचे अताेनात हाल झाले आहेत. या भागातील रहिवशांनी आम्हांला तातडीने मदत द्या. सर्व शासनाने तातडीने मदत करा. केंद्राची मदत आली नाही. राज्य सरकार, महापालिका यांनी सर्वेक्षण, पंचनामा याची वाट न पाहता तुम्ही आम्हांला मदत द्या अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. किशाेर सुभाष घशिंग म्हणाले माझी दाेन घरे पडली आहेत. खूप नुकसान झाले आहे.

या भागातील रहिवाशी महिला म्हणाल्या लाकाडच्या शिडीवर आम्ही उभे हाेताे. बाहेरुन आवाज आला काेण आहे. हाे म्हटल्यावर त्यांनी या बाहेर असे सांगितले. आम्ही शिडीवरुन उडी मारली. आमचा सर्व संसार उद्धवस्त झाला आहे. या घटनेत अनेकांच्या घरात चिखल साचला आहे. अजूनही ते घराबाहेरच आहेत.

शनिवारी रात्रभर पाऊस पडत हाेता. ही घटना साधरणतः रात्री साडे बारा नंतर घडली असावी. बीआरसी कंपनी येथील भिंतीनजीक येथून माती माेठ्या प्रमाणात आल्याचे चेंबूर येथील स्थानिकांनी सांगितले. एनडीआरएफ समवेत स्थानिक नागरिक जखमींना मदत करीत आहेत. या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यापुर्वी महापालिकेने येथील परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक हाेते अशी चर्चा देखील येथे सुरु आहे. या दुर्देवी घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकताे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या भागात सध्या ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. हे काम अहाेरात्र सुरु राहील अशी शक्यता एनडीआरएफच्या पथकातील इन्सपेक्टर राहूल रघुवंश यांनी नमूद केले. दरम्यान बीएमसीने येथील 25 कुटुंबांचे स्थलांतरण केले आहे. येथील सुमारे 500 झाेपड्यांचे स्थलांतर करण्याचा विचार बीएमसीचा आहे असेही सांगण्यात येत आहे.

याबराेबरच जमीन खचणे, दरड काेसळणे अशा घटना घडल्या आहेत. विक्राेळी, अंधेरी या भागात देखील पावसामुळे दुर्देवी घटना घडल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com