किळसवाना प्रकार : चारित्र्याच्या संशयावरुन दिर आणि सासऱ्याची सुनेवरती चक्क CCTV द्वारे पाळत

दिर आणि सासऱ्याने त्यांच्या या विधवा सुनेवर आणि तीच्या मुलीवरती पाळत ठेवण्यासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
किळसवाना प्रकार : चारित्र्याच्या संशयावरुन दिर आणि सासऱ्याची सुनेवरती चक्क CCTV द्वारे पाळत
किळसवाना प्रकार : चारित्र्याच्या संशयावरुन दिर आणि सासऱ्याची सुनेवरती चक्क CCTV द्वारे पाळतSaam TV

पुणे : पुण्यातील सांगावी पोलीस स्टेशनमध्ये (Sangavi Police Station) एका महिलेने तिच्यावरती पाळत ठेवण्यासाठी सासऱ्यांने आणि दिराने सीसीटीव्ही बसविल्याची तक्रार दिली आहे. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहारामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेल्याच्या पतीचे निधन झाले आहे. सदर महिलेला एक मुलगीही आहे. मात्र तिचा पती मेल्याने आता तिच्यावरती सासरच्या मंडळींकडून अत्याचार करण्य़ात येत आहेत.

किळसवाना प्रकार : चारित्र्याच्या संशयावरुन दिर आणि सासऱ्याची सुनेवरती चक्क CCTV द्वारे पाळत
West Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)

दिर आणि सासऱ्याने त्यांच्या या विधवा सुनेवर आणि तीच्या मुलीवरती पाळत ठेवण्यासाठी चक्क CCTV कॅमेरे लावल्याची धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेबाबत विधवा सुनेने सांगावी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर या महिलेच्या दीर व सासऱ्यांनी महिलेसह तिच्या 29 वर्षीय विवाहित मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली असून पीडित महिलेचे तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत दीर व सासरे घेत आहेत.

हे देखील पहा -

पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केलीच शिवाय संबंधित पीडित महिलेवर नजर ठेवण्यासाठी घरातील हॉल आणि किचनमध्ये सीसीटीव्हीही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे दोघींवर पाळत ठेवत आहेत. दीर व सासऱ्यांनी प्रॉपर्टीसोडून देण्यासाठी या दोघींना शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे शिवाय तुम्ही दोघी आमचं काही वाकडं करू शकत नाही. असं म्हणतच तुम्ही घराच्या बाहेर कश्या निघत नाही हे बघतो असे म्हणत धमकी या दोघांनी या माय लेकींना दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com