Mumbai : घसरगुंडीवर खेळणं चिमुरडीच्या जीवावर बेतलं; मुंबईतील दुर्दैवी घटना

मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुंबईत (Mumbai) साडेतीन वर्षीय मुलीला घसरगुंडीवर खेळणं चांगलंच महागात पडलं आहे.
Mumbai News
Mumbai News saam tv

Mumbai News : मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुंबईत (Mumbai) साडेतीन वर्षीय मुलीच्या घसरगुंडीवर खेळणं जीवावर बेतलं आहे.. घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये किडझोनमध्ये खेळण्यासाठी एका साडेतीन वर्षीय मुलीचा घसरगुंडीवरून (Slide) पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Mumbai News
Accident Video: धोकादायक वळणावर कारची दुचाकीला जोरदार धडक; जुन्नरमधील 'या' रस्त्याने आतापर्यंत घेतलेयत ४५ बळी

मिळालेल्या माहितीनुसार, दालीशा वर्मा असे या चिमुरडीचे नाव असून ती चेंबूरच्या टिळक नगर परिसरात राहत होती. आई-वडिलांसोबत दालिशा वर्मा घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये किडझोनमध्ये खेळण्यासाठी गेली होती. घसरगुंडीवरून खेळत असताना अचानक तोल गेला. दालिशाचा तोल गेल्यामुळे घसरगुंडीवरून खाली पडली. त्यानंतर दालिशाला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Mumbai News
Video: चालत्या लोकलमधून महिलेचा तोल गेला, पण 'तो' देवदूतासारखा आला; आई-बाळाचा वाचला जीव

मॉलचं म्हणणं काय ?

घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किडझोनमध्ये अनेक लहान मुले पालकांसोबत येतात. शेकडो लहान मुले या किडझोनमध्ये खेळत असतात. मॉलमध्ये मुले सुरक्षितपणे खेळू शकतात, या विचाराने पालकही आवर्जून मॉलमध्येच खेळायला घेऊन येतात. मात्र, या किडझोनमध्ये घसरगुंडीवर खेळताना चिमुरडीचा मृत्यू झाल्यामुळे मॉलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. मात्र , या मॉलमधील झेनॉक्स प्ले स्पेसचे मालक रचना हारिया यांनी या ठिकाणी सुरक्षेच्या पूर्ण उपाययोजना केल्या असल्याचं सांगितलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com