
मुंबई: राज्यात एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेकतऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरग्रस्तांची पाहणी करणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही, राज्यातील मुख्यमंत्री कार्यकर्त्यांकडे सत्कार कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. हे सरकार शेतकऱ्यांबाबतीत असंवेदनशील आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
सध्या पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पण अजूनही एक महिना होऊन गेला मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. त्यांना दिल्लीवरून ग्रीन सिग्नल मिळत नाही की, त्यांनी सगळ्याच आमदरांना मंत्रिपद देणार असे आश्वासन दिले म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. काही कळायला मार्ग नाही, असा टोलाही पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. (Ajit Pawar Latest News)
मुख्यमंत्री पद अस्तित्वात आल्यावर कामाचा खूप ताण असतो. आता बऱ्याच फाईल पेडींगवर पडल्या आहेत. यात आम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार नाही. पण आज राज्याची जनता अडचणीत आहे. शेतकरी संकटात आहेत. आणि ही सर्व परिस्थिती असताना, शेतकरी संकटात असताना मदत पोहिचवण्या ऐवजी मुख्यमंत्री जागोजागी फिरून सत्कार स्वीकारत आहेत. रात्री १० नंतर माईक बंद करायचा असतो. पण हे स्वत: मुख्यमंत्री बंद करत नाहीत, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
काहीजण बोलतात कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही, असं त्यांचे अंतर्गत ठरले असल्याचे बोलले जात आहे, असंही पवार म्हणाले.
राज्याचे प्रमुख स्वतः जर नियम तोंडातून असतील तर प्रशासन काय करणार, दुसऱ्याला त्रास होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. उपमुख्यमंत्री यांचे रात्री १० नंतर कार्यक्रम मी पहिले नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला. मुख्यमंत्री गाठीभेटी घेत आहेत दर्शन घेत आहेत. पण शेतकरी बाधित झाला आहे. त्यात तुम्ही पालकमंत्र्यांची नेमणूकसुद्धा करत नाहीत. मला तर या दौऱ्यात अनेक अनुभव आले आहेत, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.