तुरुंगात असलेल्या मलिकांना किडनीचा त्रास, देशमुखांना खांदेदुखी तर राणांना स्पॉन्डिलायसिस

Anil Deshmukh Latest News : नवनीत राणा यांना मनक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्त वेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे.
तुरुंगात असलेल्या मलिकांना किडनीचा त्रास, देशमुखांना खांदेदुखी तर राणांना स्पॉन्डिलायसिस
Leaders in jail suffering; malik have kidney problemSaam Tv

सुरज सावंत, रश्मी पुराणिक

मुंबई: विविध आरोपांखाली अटकेत असलेले राज्यातील नेते मंडळी हे तुरुंगात आजारी पडले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना किडनीची त्रास होत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना हृदयविकाराचा त्रास आणि खांदेदुखी होत आहे. तर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मान आणि कंबर आणि पाठदुखीचा म्हणजेच स्पॉन्डिलायसिसचा त्रास होत आहे. या तिन्ही नेत्यांनी याबाबत अर्ज करत वैद्यकीय उपचाराची मागणी केली आहे. (Leaders in jail suffering; malik have kidney problem, deshmukh hav heart problem and rana have spondylosis)

हे देखील पाहा -

नवाब मलिकांचा अर्ज

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. किडनीचा त्रास होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी मलिक यांनी परवानगी मागितली आहे. मलिकांच्या वैद्यकिय उपचारासाठी करण्यात आलेल्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध असून ईडी आज त्याबाबत उत्तर न्यायालयात दाखल करणार आहे.

अनिल देशमुखांचा अर्ज

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. खादेदुखीमुळे शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी यासाठी अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्याचबरोबर ह्रदयविकारचीही समस्या असून वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार व्हावेत यासाठी परवानगी मिळावी आणि घरचे जेवण मिळावे अशीही मागणी या अर्जात केली गेली आहे. जे-जे रुग्णालयात उपचाराच्या सुविधा कमी असून खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी असं या अर्जाच म्हटलं आहे. त्यावर न्यायालयाने जे-जे रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून हा अहवाल आल्यानंतर निर्णय देण्यात येईल. त्यावर ईडीनेही उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.

खासदार नवनीत राणांनीही पाठ-कंबरदुखीचा (स्पॉन्डिलायसिस) त्रास

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पाठीचा मणका आणि कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यांना अगोदरपासूनच स्पॉन्डिलायसिस हा आजार आहे. त्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जमिनीवर बसवण्यात आलं आणि झोपावं लागलं असा आरोप करत त्यामुळे त्यांचा त्रास वाढला असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. सिटीस्कॅन करायला तुरुंग अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. जर मला काही झालं तर तुम्ही (तुरुंग अधिकारी) त्याला जबाबदार असेल. त्यामुळे तात्काळ आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवावी असा अर्ज राणांच्या वकिलांनी भायखळा कारागृहाकडे केला आहे.

Leaders in jail suffering; malik have kidney problem
चलो अयोध्या! औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्येत 'राज'गर्जना; मनसैनिक लागले कामाला

नवनीत राणा यांना मनक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्त वेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे. २७ तारखेला उपचारासाठी त्यांना जे-जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात यावा असे सांगितले. याबद्ददल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले. वेदना असह्य झाल्याने नवनीत राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात आला. नवनीत राणा यांच्याबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राणा यांनी वकिलांमार्फत केली आहे. या पत्रांची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पाठवली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.