धक्कादायक! राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बील; जाणून घ्या कोणी किती थकवले

सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचं एक-दोन महिन्याचं घरगुती वीज बिल थकलं तरी, संबंधित विभागातील महावितरण कार्यालयाकडून तत्परतेनं वीज कनेक्शन कापलं जातं.
धक्कादायक! राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बील; जाणून घ्या कोणी किती थकवले
Electricity Bill- Saam Tv

मुंबई: राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी लाखो रुपयांची वीज बिलं (Electricity Bill) थकवल्याची बाब समोर आली आहे. या थकबाकीदार 'व्हीआयपी' ग्राहकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आमदार, खासदारांसह मंत्री अशा जवळपास ३७२ ग्राहकांची १ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचं एक-दोन महिन्याचं घरगुती वीज बिल थकलं तरी, संबंधित विभागातील महावितरण कार्यालयाकडून तत्परतेनं वीज (Electricity) कनेक्शन कापलं जातं. मग आता थकबाकीदार आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे वीज कनेक्शन कापण्यात महावितरण तत्परता दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. आपली अशी कोणतीचा थकबाकी नसल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे देखील पाहा

नाव किती वीजबिल थकवले

आरोग्यमंत्री राजेश टोपे- ४ लाख रुपये

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- १० हजार रुपये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले- २ लाख ६३ हजार रुपये

राज्यमंत्री विश्वजित कदम- २० हजार रुपये

श्रीमंत युवराज संभाजीराजे- १ लाख २५ हजार

माजी मंत्री सुभाष देशमुख- ६० हजार रुपये

भाजप आमदार जयकुमार गोरे- ७ लाख रुपये

माजी गृहमंत्री अनिल देशमुख - २ लाख २५ हजार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे - ७० हजार रूपये

आमदार समाधान आवताडे- २० हजार

आमदार राजेंद्र राऊत, बार्शी- ३ लाख ५३ हजार रूपये

आमदार बबनराव शिंदे व त्यांचे

आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांचे २२ कनेक्शन

- ७ लाख ८६ हजार रुपये

खासदार रणजितसिंह निंबाळकर - ३ लाख रुपये

आमदार संग्राम थोपटे- १ लाख रुपये

माजी खासदार प्रतापराव जाधव- १ लाख ५० हजार रुपये

शिवसेना आमदार सुहास कांदे- ५० हजार रुपये

आमदार रवी राणा - ४० हजार रुपये

आमदार वैभव नाईक - २ लाख ८० हजार रुपये

माजी मंत्री विजयकुमार गावित- ४२ हजार रुपये

माजी आमदार शिरीष चौधरी- ७० हजार रुपये

मंत्री संदीपान भुमरे- १ लाख ५० हजार रुपये

खासदार रजनीताई पाटील- ३ लाख रुपये

आमदार प्रकाश सोळंके- ८० हजार रुपये

आमदार संदीप क्षीरसागर- २ लाख ३० हजार रुपये

राज्यमंत्री संजय बनसोडे- ५० हजार रुपये

आमदार अशिष जयस्वाल- ३ लाख ३६ हजार रुपये

आमदार महेश शिंदे- ७० हजार रुपये

माजी मंत्री सुरेश खाडे - १ लाख ३२ हजार रुपये

सुमन सदाशिव खोत- १ लाख ३२ हजार रुपये

Edited By - Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.