विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीच्या पाठोपाठ भाजपच्या आमदारांचाही हॉटेलवर मुक्काम

महाविकास आघाडीही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीच्या पाठोपाठ भाजपच्या आमदारांचाही हॉटेलवर मुक्काम
bjp logosaam tv

मुंबई: दोन दिवसापूर्वी राज्यसभा निवडणुकीचा (Election) निकाल समोर आला, राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून सहाव्या जागेवर धनंजय महाडिक विजयी झाले. राज्यात आता विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता महाविकास आणि भाजपकजूनही (BJP) सुरू झाली. महाविकास आघाडीचे आमदार हॉटेलमध्ये ठेवणार असल्याच्या सुरू असताना, आता भाजपही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

bjp logo
वचन हेच आमचे हिंदुत्व; अयोध्येतून आदित्य ठाकरे काय म्हणाले?

विधान परिषदेच्या निवडणुकीत (Election) आपले आमदार फुटू नयेत म्हणून पक्ष आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवतात. राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसह भाजपचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह, भाजपमनेही तयारी सुरू केली आहे. भाजपही आपल्या आमदारांना मुंबईत एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१८ जूनपासून भाजप आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवणार आहे. हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये आमदरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

bjp logo
मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही पण ईश्वराने दिलं; जल आक्रोश मोर्चात पाऊस पडताच फडणवीसांची टोलेबाजी

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) सहाव्या जागेवर विजय मिळवला. कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला. यामुळे राज्यात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राज्यात आता हणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूका बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण ऐन वेळेला ही निवडणूक लागली आहे. त्यामुळे २० जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ही निवडणूक जिंकणार असल्याचे म्हटले आहेत. तर भाजपनेही ही जागा जिंकणार असल्याचे म्हटले आहे. भाजपकडून प्रविण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com