Leopard Viral Video: कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; २ नागरिकांसह ३ जनावरांवर हल्ला

Leopard Attacks in Kolsewadi Kalyan: बिबट्याला पकडण्याठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Leopard Attacks in Kolsewadi Kalyan
Leopard Attacks in Kolsewadi Kalyantwitter/@baisaneakshay

Kalyan Leopard News: कल्याणमध्ये बिबट्या शिरल्याने एक गोंधळ उडाला आहे. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत बिबट्या शिरल्याने नागरिकांचां एकच गोंधळ उडाला. चिंचपाडा रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या इमारतीत आज पहाटे अचानक बिबट्या शिरला.

बिबट्याने आतापर्यंत दोन नागरिक आणि ती प्राण्यांवर हल्ला केला आहे. बिबट्याला पकडण्याठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Kalyan Latest News)

Leopard Attacks in Kolsewadi Kalyan
Maharashtra Vs Karnataka: महाराष्ट्रातल्या ४० गावांनंतर आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही कर्नाटकचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे भक्ष्याच्या शोधत हा बिबट्या कल्याण पूर्वेत (Kalyan) आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला दिली आणि सर्व सूत्र तातडीने फिरली.

नागरिकांच्या आरडा-ओरड्यामुळे श्रीराम अनुग्रह या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील पॅसेज मध्ये बिबट्याला (Leopard) अडकवून ठेवण्यात आले. मात्र दोन नागरिकांना या बिबट्याने जखमी केलं असून तीन जनावरांवर देखील हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Leopard Attacks in Kolsewadi Kalyan
महाराष्ट्र असा तसा वाटतो का? अजित पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; सरकारलाही सुनावलं

इमारतीमधील तीन लोकांवर हल्ला करून मग हा बिबट्या इमारतीत शिरला. आता इमारतीमधील नागरिकाना रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आलं असून इमारत रिकामी केली असल्याची माहिती वन विभागचे अधिकारी आर. चन्ने यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र शेजारीच हाजीमलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com