मुंबईच्या गोरेगाव परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा मृददेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
leopard found dead in aarey forest
leopard found dead in aarey forest saam tv

मुंबई : गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दाट झाडी असल्याने बिबट्यांचा मुक्तसंचार (leopard) होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. याच परिसरात बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु, गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा मृददेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरे कॉलनीतील फिल्मसिटीच्या सेटजवळ (Film city) बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. मृत पावलेला बिबट्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. (leopard dead body found in goregaon film city area)

leopard found dead in aarey forest
वेदांता वडापावची गाडी नाही, सेनाभवनावरून उचलली मातोश्रीला लावली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आरो कॉलनी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोरेगाव फिल्मसिटीच्या परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. बिबट्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं बोलंलं जात आहे. कारण बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा आढळलेल्या नाहीत.

leopard found dead in aarey forest
अरे देवा! विमान जाणार होते पोर्तुगालला पण पोहोचले स्पेनला, पुढे जे झालं ते वाचून व्हाल थक्क

बिबट्या मृतावस्थेत रस्त्यावर पडला असल्याचे फिल्मसिटीतील कर्मचाऱ्यांनी पाहिलं.त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरे पोलीस आणि नॅशनल पार्कचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याचा मृतदेह नॅशनल पार्क वन्यजीव रुग्णालयात दाखल केला. या रुग्णालयात मृत बिबट्याचं शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मृत पावलेला बिबट्या ७ महिन्यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com