आपण कुठं ही जाऊ, पण आढळराव पाटलांना खासदार करु; संजय राऊतांचं आश्वासन

'शिवाजी आढळराव पाटील हे 24 बाय 7 अ‍ॅक्टीव असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का?'
Sanjay Raut/ Shivajirao Adhalrao patil
Sanjay Raut/ Shivajirao Adhalrao patilSaam TV

पुणे : माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे इकडची दुनिया तिकडे करू, हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) संसदेत जाणारच असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लांडेवाडी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं. शिवाजी आढळराव पाटील हे 24 बाय 7 ऍक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवरही (Amol Kolhe) निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

आज आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाहीत. म्हणून उमेद हरवू नका. कारण आज नाहीत म्हणजे उद्या नसणार असं नाही. हे लक्षात असू द्या. कारण हे राजकारण अन मतदार ही चंचल असतात. गंगुबाई काठेवाडी सिनेमा पहा, आम्ही सिनेमे फार पाहतो असही ते म्हणाले.

हे देखील पाहा -

भाजपसोबत (BJP) असताना कुठं आमच्या घरावर सोन्याच्या माळा होत्या; पण आजची परिस्थिती खूप बरी आहे. मागील पाच वर्षे ही काळिकुट्ट होती, हे पुढच्या काळात तुम्हाला कळेलच. मी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण बाळासाहेबांची मला शिकवण आहे, पवार साहेब (Sharad Pawar) ही सोबतीला आहेत. मला दोन गुरू आहेत. त्यामुळं मैदानात बघा असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे इकडची दुनिया तिकडे करू, हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील संसदेत जाणारच असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी आज लांडेवाडी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं त्यामुळे राऊतांच्या या विधानावरुन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील कुठल्या दारातुन खासदार होणार की दुसऱ्या पक्षातुन होणार या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com