मुंबई डबेवाला संघटनेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

आधीच करोना मुळे रोजगार जेमतेम राहीला आहे त्यात सायकलला दहा हजार रूपये खर्च कसा करायचा ? हा प्रश्न डबेवाल्यांन पुढे उभा राहीला आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

निवृत्ती बाबर

मुंबई - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमीवर डबेवाल्यांचा व्यवसाय अद्याप पर्यंत स्थिरावला नाही. वर्क फॅार्म होमचा मोठा प्रभाव व्यवसायावर पडला आहे. कॅान्हेंट शाळेचे डबे ही बंद आहेत. अशा स्थितीतही काही मोजके डबेवाले मुंबईत (Mumbai) काम करत आहेत. त्यातच आता चार दिवसात डबेवाल्यांच्या एक दोन नव्हेत तर सहा सायकली विविध ठिकाणा वरून चोरीला गेल्या आहेत.

हे देखील पाहा -

नालासोपारा, बोरीवली, विलेपार्ले येथील स्टेशनच्या बाहेर उभ्या केलेल्या सायकली पैकी काही सायकली चोरीला गेल्या आहेत. ज्या डबेवाल्यांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत त्यांना दहा हजार रूपयांचा फटका बसला आहे. या मुळे डबेवाल्यांची चिंता वाढली आहे जर सायकल चोरी अशीच चालू राहीली तर उद्या आपली ही सायकल चोरीला जावू शकते. अशी शंका डबेवाल्यांनमध्ये निर्माण झाली आहे.

Mumbai News
ब्रिटनच्या जोडप्यानं मुलाचे नाव ठेवले 'पकोडा'; कारण वाचून पोट धरून हसाल...

नविन सायकलची किंम्मत दहा हजार रूपया पर्यंत जाते. आधीच करोना मुळे रोजगार जेमतेम राहीला आहे त्यात सायकलला दहा हजार रूपये खर्च कसा करायचा ? हा प्रश्न डबेवाल्यांन पुढे उभा राहीला आहे. चोरी गेलेल्या सायकलींचा लवकरात लवकर शोध घ्यावा व डबेवाल्यांच्या सायकली स्टेशनच्या ज्या भागात लावल्या जातात तेथे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी “मुंबई डबेवाला असोशिएशन “ निवेदनाच्या माध्यमातुन करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com