खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्याSaam Tv

खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणाकरिता आलेल्या लष्करामधील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणाकरिता आलेल्या लष्करामधील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. रश्मी आशुतोष मिश्रा (वय- ४३, रा. डेहराडुन) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकार्‍याचे नाव आहे.

हे देखील पहा-

पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली आहे. या संस्थेत ९ वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देखील डेन्ह्यात येत आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाकरिता या लेफ्टनंट कर्नल महिला आली होती.

खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)

४३ वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे. कौटुंबिक कारणावरुन तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक मांडण्यात आला आहे. या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांनी भेट दिली आहेत. लष्कराची संबंधित हा सर्व प्रकार असल्याने त्याची वरिष्ठ पातळीवरुन तपासणी करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.