अंबरनाथ तालुक्यात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त; 9 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट
Ambernathअजय दुधाणे

अंबरनाथ तालुक्यात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त; 9 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट

या ठिकाणी असलेल्या तब्बल 9 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पदन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. तर यावेळी अड्ड्यांवर दारू बनवणारे पाच जण पळून गेले असून या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

अंबरनाथ - तालुक्‍यात अवैधरित्या सुरू असलेले गावठी दारू निर्मितीचे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) उध्वस्त केले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल सुद्धा नष्ट करण्यात आला आहे. अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील माणेरे आणि द्वारली गावात गावठी दारूची निर्मिती करणारे अड्डे सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या ठिकाणी धाड टाकत हे हातभट्टी दारू चे अड्डे उध्वस्त केले. (Ambernath Latest News)

हे देखील पहा -

या ठिकाणी असलेल्या तब्बल 9 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पदन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. तर यावेळी अड्ड्यांवर दारू बनवणारे पाच जण पळून गेले असून या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.