लोणावळा-पुणे रेल्वेसेवा २०-२५ मिनिटे ठप्प झाली, 'हे' आहे त्यामागचं कारण

सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रकात सतत बदल केले जात आहेत.
Lonavala - Pune Local
Lonavala - Pune LocalSaam TV

सचिन जाधव -

पुणे : लोणावळा - पुणे लोकल (Lonavla - Pune Local) खाली म्हैस आल्याने तळेगावजवळ झालेल्या अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात (Railway Accident) रेल्वेच्या खाली म्हैस अडकल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे रेल्वेसेवा जवळपास २० ते २५ मिनिटे ठप्प झाली होती.

सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रकात सतत बदल केले जात आहेत. शिवाय लोणावळा-मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच आज लोणावळा -पुणे या लोकल (Local) खाली एक म्हैस आल्याने रेल्वेचा अपघात झाला. हा अपघात तळेगावजवळ झाल्यामुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या होत्या. (Heavy rain in Lonavala-Mumbai)

पाहा व्हिडीओ -

या संपुर्ण अपघाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र, जनावरांना सुरक्षित अंतरावरती ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांनी घ्यायला हवी जेणेकरुन त्यांची जनावरे दगावणार नाहीत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com