Lonavla: गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

मावळ मधील लोणावळा शहरात रात्रीच्या वेळी गाई, वासरांना बेशुद्ध करून पळवुन नेण्याचा प्रकार पहाटेच्या सुमारास लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे उघडकीस आला आहे.
Lonavla: गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
Lonavla: गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैददिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ : मावळ मधील लोणावळा Lonavala शहरात रात्रीच्या वेळी गाई, वासरांना बेशुद्ध करून पळवुन नेण्याचा प्रकार पहाटेच्या सुमारास लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे उघडकीस आला आहे. भटक्या गाईंना Cow बेशुद्ध करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शहरात चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

हे देखील पहा-

मध्यरात्री साखर झोपेत असताना या मुक्या जनावरांना काही तरुणांनी पाव खायला टाकले आणि पटकन भुलीचे इंजेक्शन देऊन गाई वासरांना बेशुद्ध केल्यावर चार चाकी गाड्यांमध्ये भरुन नेण्याचा प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे.

Lonavla: गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून वडिलांचा खून

या गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावे असं निवेदन विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ आणि वारकरी संप्रादय हिंदु समिती लोणावळा यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. पोलीसांनी गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com