प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळा पोलिसांच्या ताब्यात

भोला कुमार असे अटक करण्यात आलेल्या खुनी प्रियकराचे आहे.
प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळा पोलिसांच्या ताब्यात
प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळा पोलिसांच्या ताब्यातSaam Tv

मावळ - प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण चालू असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खुनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भोला कुमार असे अटक करण्यात आलेल्या खुनी प्रियकराचे आहे. मृत तरुणी सोबत भोला कुमार यांचे प्रेमसंबंध होते.

भोला कुमार हा तरुणीच्या वडिलांच्या सोबत प्लंबिंगचे काम करीत होता आणि मागील दीड वर्षांपासून त्यांच्या घरी राहत होता. या दरम्यान भोला आणि मृत तरुणीचे सूत जुळले. मात्र तरुणीच्या घरी हे समजल्यावर भोला कुमार याला इतरत्र बाहेर राहण्यासाठी जावं असं सांगण्यात आले. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे तरुणी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. यावर तिच्या घरच्यांनी भोलाकुमार याच्याशी संपर्क साधला असता.

हे देखील पहा -

भोलाने देखील त्यांच्यासोबत तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र उशिरापर्यंत तिचा काहीही तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असत त्या ठिकाणी ही तरुणी आढळून आली. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांनी भोला कुमार याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळा पोलिसांच्या ताब्यात
अंबरनाथच्या आयुध निर्माणीने बनवली एटीआर गन!

औरंगाबाद पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो लोणावळ्यात पळून येत असल्याचे त्यांना समजले. त्या महितीच्या आधारे औरंगाबाद पोलिसांनी लोणावळा पोलिसांना भोलाची माहिती दिली. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी लोणावळ्यातील सेंटर पॉईंट याठिकाणी आपलं कौशल्य पणाला लावीत सापळा रचला आणि भोला कुमार याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपी भोका कुमार याला औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com