'लूज कनेक्शनमुळे स्पार्क होतो' मुख्यमंत्र्यांचा भाजप आ. रवींद्र चव्हाणांना मिश्किल टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सभाषणात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना टोला हाणल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
'लूज कनेक्शनमुळे स्पार्क होतो' मुख्यमंत्र्यांचा भाजप आ. रवींद्र चव्हाणांना मिश्किल टोला
'लूज कनेक्शनमुळे स्पार्क होतो' मुख्यमंत्र्यांचा भाजप आ. रवींद्र चव्हाणांना मिश्किल टोलाSaam Tv News

डोंबिवली : केडीएमसीमधील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात आज राजकीय महानाट्य पाहायला मिळालं. तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमक आणि जागवण्यात आलेल्या युतीच्या आठवणी ही देखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सभाषणात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना टोला हाणल्याची चर्चा आता रंगू लागली आणि आता याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Loose connection sparks, CM's mischievous criticism of MLA Ravindra Chavan)

हे देखील पहा -

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाषण केले. मात्र पाटील यांचे भाषण पालकमंत्री मंत्री यांच्याआधी होते. तांत्रिक बिघाडामुळे पाटील यांचे भाषण नंतर झाले आणि मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण चालू केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी तुमचा आवाज तिथे जात नव्हता, मात्र आपल्या दोघांचे कनेक्शन स्ट्रॉंग होते. त्यामुळे हे कनेक्शन स्ट्रॉंग ठेवले पाहिजे, थेट ठेवले पाहिजे आणि कनेक्शन लूज झाले तर रवींद्र चव्हाण यांच्यासारखे होते. लूज कनेक्शन मुळे स्पार्क होतो.

'लूज कनेक्शनमुळे स्पार्क होतो' मुख्यमंत्र्यांचा भाजप आ. रवींद्र चव्हाणांना मिश्किल टोला
शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

दरम्यान कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना हसत सांगितले की टाइट करा आणि रवी चव्हाण यांचे सुद्धा टाईट करा. मुख्यमंत्री यांनीही पाटील यांना उत्तर देत सांगितेल रवी चव्हाण यांना टेस्टर घालुन पाहतो आहे मी आणि एकच हश्या पिकला.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com