
बहुप्रतिक्षेत असलेला डीलाईल रोड ब्रिज आज अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल पाच वर्षानंतर हा ब्रिज सुरू करण्यात आलाय. यामुळे लालबाग-परळकरांची वाहतुक कोंडीची चिंता मिळणार आहे.
अनेक अडचणींचा सामना करत हा ब्रिज खुला झाला आहे. पाचवेळा या पुलाच्या उद्घाटनाची तारीख देण्यात आली होती, मात्र अखेर आज त्याला मुहूर्त मिळाला.
लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै २०१८पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. पुलाचं काम मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे करत होती. यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे हद्दीवरील पुलाचा भाग तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून २०२२मध्ये पूर्ण करण्यात आले. तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबर २०२२ ला बसवण्यात आला. (Latest Marathi News)
पुढे १ जूनपासून लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर ऊर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वेपर्यंतची मार्गिका खुली करण्यात आली.
गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ब्रिज पूर्णपणे खुला न झाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे सातत्याने या ब्रिजची पाहणी केली. दरम्यान, आज आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने गणरायाची मूर्ती घेऊन या ब्रिजचं उद्घाटन केलं. ठाकरे गटाच्या आक्रमकपणामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांना नागरिकांना ब्रिज खुला करावा लागला, असं ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.