शिंदे साहेब आपलंसं करून घ्या नाहीतर काही खरं नाही; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv

मुंबई: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची अभिनंदन केले, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीतर्फे (NCP) राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले.वआता सर्व सदस्यांना न्याय देण्याचे काम नार्वेकर करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर मिश्किल टिप्पणी केली.

Ajit Pawar
Maharashtra Political Crisis Live Updates: "शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं "

अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर खूप हुशार आहेत. ते पक्ष प्रमुखांना आपलेसे करुन घेतात. ते शिवसेनेत होते, तेव्हाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना जवळ केल होते. पुढ ते आमच्याकडे आम्हालाही त्यांनी आपलंसं केले. आम्ही त्यांना मावळ लोकसभा मतदार संघात उभ केलं. पण यात त्यांचा पराभव झाला, आता नार्वेकर भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आपलंसं केले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे तुम्ही जरा जपून राहा आपलंसं करुन घ्या नाहीतर काही खरं नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

Ajit Pawar
कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, आदित्य ठाकरेंची टीका

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लाट येण्याआधी भाजप या राज्याच येण्याची काहीच शक्यता नव्हती. आता आमच्याकडूनच तिथं गेलेली जास्त लोकं भाजपमध्ये गेलेली दिसतात. समोर आमच्याकडचीच दिसतात. हे पाहून मला भाजपातील मूळ मान्यवरांचे खूप वाईट वाटतं आहे. पहिली लाईनच जरी तुम्ही पाहिली, तरी तुमच्या लक्षात येईल, असंही अजित पवार म्हणाले. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झालेत, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलेलं नाही, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Editedb By Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com