महाराष्ट्र बंदला पुण्याच्या ग्रामीण एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी...

बंदला प्रतिसाद नाही
महाराष्ट्र बंदला पुण्याच्या ग्रामीण एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी...
महाराष्ट्र बंदला पुण्याच्या ग्रामीण एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी...रोहिदास गाडगे

पुणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

हे देखील पहा -

मात्र आज सकाळपासुन पुण्याच्या ग्रामीण भागातील राजगुरुनगर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याने महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे.सकाळपासुन एसटीची सेवा सुरु असल्याने नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडले असुन राजगुरुनगर आगारातुन एसटीच्या लोकल वाहतुकसेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या असल्याने आज बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.