मंत्रिमंडळ विस्तार, नक्षलवाद, धमक्या...; सर्वच प्रश्नांवर स्वतः CM एकनाथ शिंदेंनी दिली उत्तरे

मंत्रिमंडळ विस्तारापासून ते नक्षलवादविरोधी मोहीम, धमक्या आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोप आणि टीकेला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली आहेत.
Eknath shinde
Eknath shinde saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना झेड दर्जाची सुरक्षा नाकारल्यापासून ते त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता मंत्रिमंडळ विस्तारापासून ते नक्षलवादविरोधी मोहीम, धमक्या आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा असलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून होत असलेल्या आरोप आणि टीकेला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली आहेत. (Eknath Shinde News )

Eknath shinde
Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल! पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही वीजपुरवठा खंडीत

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार चालवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, पण तो कधी? त्यात कुणाला संधी मिळणार? त्यात शिंदे-फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर पुन्हा सुरू झालेली चर्चा याबाबत एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, की 'मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत गेलो होतो. राष्ट्रपती मोठ्या बहुमतानं विजयी झाल्या आहेत. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. देशातील सर्व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना निमंत्रित केलं होतं. मोदी, अमित शहा त्यावेळी उपस्थित होते. स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. तिथं काही कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही. पण लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.'

नक्षलवाद्यांनी शिंदे यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी केला होता. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'सुहास कांदे यांनी जे भाष्य केले आहे, त्यावर शंभुराज देसाई यांनी सर्वकाही सांगितले आहे. गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून काम करत होतो. त्यावेळी नक्षलवादविरोधी मोहीम तीव्र केली होती. गडचिरोलीतील नक्षलवाद कमी करणे, त्या भागाचा विकास करणे आणि उद्योग सुरू करणे हा उद्देश होता. त्यात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी नक्षलविरोधी कारवाई केली. पोलिसांचा सन्मानही केला. त्यांना बक्षीस जाहीर केले. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या. पण मी धमक्यांना भीक घातली नाही आणि घालणारही नाही. झेड प्लस सुरक्षेबाबत शिफारस केली होती. शंभुराज देसाईंनी तशी भूमिका घेतली होती. त्याबाबत ते बोललेही आहेत.'

Eknath shinde
एकनाथ शिंदेंच्या झेड सुरक्षेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

बाळासाहेबांना तेव्हा अधिक दुःख झालं असेल- शिंदे

सध्या शिवसेना नेमकी कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. बाळासाहेब असते तर त्यांना वाइट वाटलं असतं, असे ते म्हणाले होते. त्याबाबत शिंदेंना विचारलं असता, बाळासाहेबांना आवडणारी आणि त्यांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आहे. या राज्यात जे युतीचे सरकार होतं, त्याचे शिल्पकार बाळासाहेब होते. ज्या दिवशी निवडणूक लढवली. त्यावेळी जनमताने कौल दिला. जनतेचे महायुतीला कौल दिला. दुर्दैवाने भाजपसोबत सत्ता स्थापन झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि त्याच दिवशी बाळासाहेबांना दुःख झाले असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं नाही. ज्या दिवशी तशी वेळ येईल, त्यावेळी शिवसेना बंद करेल, असे स्वतः बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे ज्या दिवशी महाविकास आघाडी झाली, त्या दिवशीच बाळासाहेबांना दुःख झाले असेल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आनंद झाला असेल. एकनाथ शिंदे, ५० आमदार आणि शिवसेना नेते अन्यायाविरुद्ध रस्त्यावर येत आहेत. शिवसेना वाचवण्यासाठी हे लोक एकत्र आले आहेत, याचा आनंद बाळासाहेबांना झाला असेल, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही प्रश्न विचारलं असता, आम्ही कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. आताच्या कामांना स्थगिती दिलेली नाही. जे निर्णय घाईगडबडीत घेतले, जवळपास ४०० जीआर काढले. अल्पमतात सरकार असताना, त्या सरकारने काही निर्णय घेतले, त्यांना स्थगिती आहे. हे सरकार विकासकामांना स्थगिती देणार नाही. छत्रपती संभाजी महाराज तर आमचे आराध्य दैवत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com