Mantrimandal Vistar 2023: मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार लवकरच, पालकमंत्रिपदाच्याही अदलाबदलीची शक्यता, पुण्याचं काय?

Maharashtra Cabinet Expansion 2023: लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा टप्पा पार पडणार असून काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सुद्धा बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News Saam TV

Maharashtra Cabinet Expansion Breaking News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना फुटीला वर्षपूर्ती होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांमध्ये युती सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) दुसरा टप्पा पार पडला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या युती सरकारमधील एन्ट्रीनंतर शिवसेना आणि भाजपमधील मंत्र्यांकडे असलेली महत्वपूर्ण खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे देण्यात आली.

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Pavsali Adhiveshan 2023: शिंदे सरकार पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळणार? काय आहे कारण?

दरम्यान, आता लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा टप्पा पार पडणार असून काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सुद्धा बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे.

त्यांच्या जागी अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.

मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्रीपदासाठी नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे हा तिढा नेमका कसा सोडवला जाणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त आमदारांचं सूत्र ठरलं! भाजपला 6 तर राष्ट्रवादीला 3 जागा; शिंदे गटाला किती जागा?

पुणे जिल्ह्यात (Pune News) आपला गट मजबूत करण्यासाठी अजित पवार यांना पालकमंत्रीपद हवे असल्याची चर्चा आहे. युती सरकारच्या विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवारच पालकमंत्री हवेत.

मात्र, या मागणीला भाजपकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धर्मराव बाबा अत्राम यांना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ व बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com