Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाची लागणार वर्णी?

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली वाढल्या असून गणेशोत्सवापूर्वी विस्तार होईल, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Cabinet expansion latest updates
Maharashtra Cabinet expansion latest updatesSaam TV

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली वाढल्या असून गणेशोत्सवापूर्वी विस्तार होईल, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात १४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असून नेमकी कुणाची वर्णी लागणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Cabinet expansion latest updates
NCP Crisis News: अजित पवारांसह बंडखोर आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांचं मोठं विधान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भाजप हा महायुतीतील (Maharashtra Politics) सर्वात मोठा पक्ष असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ७ जागा दिल्या जाणार आहे. तर उर्वरित मंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

अगदी दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. याशिवाय पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपमधील १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा शिंदे गटातील अनेक आमदारांना होती. मात्र, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने त्यांची ही आशा काही दिवसांसाठी लांबणीवर पडली. अजित पवार सत्तेत सहभागी होताच त्यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Maharashtra Cabinet expansion latest updates
G20 Summit 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकलं: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिक स्पर्धा आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे, भरत गोगावलेंनी फक्त मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा केलाय.

त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार हेच पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होताच शिंदे गटात आनंदाची लाट आली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदारांनी तर आपल्या मंत्रीपदाबाबतची इच्छा जगजाहीर केली होती, अपक्ष आमदार बच्चू कडू देखील मंत्रिपदावर दावा करत होते.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com