
मुंबई: मागील काही महिन्यांपासून देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात ३,८८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात २८०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८५ टक्के एवढे आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन (corona new patients) रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा १९५८२ वर पोहोचला आहे.
मुंबई विभाग - मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई-विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका या परिसरात ३३१७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद
नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी परिसरात कोरोनाचे ४९ नवीन रुग्ण आढळले.
पुणे विभाग - पुणे महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा आदी क्षेत्रांत ३३९ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या क्षेत्रात ४७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका या भागांत २३ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका या भागात १३ नवीन कोविड ६ चा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत.
अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या परिसरात २६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली आदी भागात ७६ नवीन कोरोनाबाधित आढळले.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.