नोकरीची चिंता मिटणार; राज्यात विविध सरकारी विभागांसाठी होणार मेगाभरती

सुशिक्षित बेरोजगारांची लवकरच नोकरींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. कारण राज्यात लवकरच सरकारी नोकरी मेगाभरती होऊ शकते.
Maharashtra finance department will lifted restrictions for mega recruitment
Maharashtra finance department will lifted restrictions for mega recruitmentSaam Tv

मुंबई : सुशिक्षित बेरोजगारांची ( Unemployment ) लवकरच नोकरींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. कारण राज्यात लवकरच सरकारी नोकरी मेगाभरती होऊ शकते. सध्या राज्यातील शासनाच्या विविध ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्या पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची मेगाभरती होऊ शकते. यामुळे राज्यातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना लवकरच नोकरीची ( Job ) संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Maharashtra finance department will lifted restrictions for mega recruitment )

हे देखील पाहा -

अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे सरकारी नोकर भरतीकडे लक्ष लागलेले असते. मात्र, राज्यात गेल्या सहा वर्षांपासून सरकारी नोकरी भरती बंद होती. राज्य सरकारी विभागांमध्ये मागील सहा वर्षांपासून मोठी मेगाभरती अद्याप झाली नाही. सध्या राज्याच्या गृहविभाग, जलसंपदा विभाग, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल आदी. विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे. मुंबईसहित राज्यात अनेक सुशिक्षित पदवी-पदवीधर उमेदवार शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्याने घरीच बसून आहे. त्यामुळे देशासहित राज्यातही बेरोजगारींचे प्रमाण वाढले आहे. तर अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी शहरात किंवा ग्रामीण भागात मिळेल ते काम करताना दिसत आहे. गेल्या सहा वर्षापासून मोठी मेगाभरती झाली नसल्यानं सुशिक्षितांमध्ये नाराजीचा प्रचंड सूर आहे.

Maharashtra finance department will lifted restrictions for mega recruitment
Nandurbar : पाण्यासाठी महिलांची वणवण; तीव्र पाणीटंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

दरम्यान, सुशिक्षित बेरोजगारांची नाराज लक्षात घेत राज्य सरकारने गेल्या सहा वर्षांपासून रखडलेली मेगाभरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे राज्य विभागातील रिक्तपदांच्या ५० टक्के पदभरती होईल, असे वित्त विभागातील सुत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची नोकरीची चिंता मिटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र,तरुण-तरुणींना राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहायला लागणार आहे.

राज्यातील सरकारी पदांची स्थिती

एकूण मंजूर पदे

११,५३,०४२

भरलेली पदे

८,७४,०४०

रिक्त पदांची संख्या

२,०६,३०३

वेतनावरील एकूण खर्च

१.३१ लाख कोटी

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com