महाराष्ट्र सरकारला राज ठाकरेंची भीती; महाविकास आघाडीला घरचा आहेर

सरकारने राज ठाकरेंना घाबरु नये, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करावी, असंही संजय निरुपम म्हणाले.
महाराष्ट्र सरकारला राज ठाकरेंची भीती; महाविकास आघाडीला घरचा आहेर
Raj Thackeray SAAM TV

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणावरुन महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार राज ठाकरे यांना घाबरत असल्याचा आरोप निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यामुळेच राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेवर कारवाई केली नसल्याचेही निरुपम म्हणाले.

औरंगाबादमध्ये झालेल्या मनसेच्या सभेत नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी राज ठाकरे यांना अटक केली पाहिजे, राज ठाकरेंना राज्यात जातीय वाद पसरवण्यापासून रोखणे गरजेचे आहे, असंही निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray Visit on Pune | राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यात येण्याचं कारण अस्पष्ट | Pune

काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी मनसेला औरंगाबादमध्ये सभा घेण्यासाठी १८ नियम दिले होते, त्यातील राज ठाकरे यांनी १२ नियमांचे उल्लंघन केले आहे. यासह राज्यातील दोन कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तरीही अजून महाराष्ट्र पोलीस कोणतीच कारवाई का करत नाही, असा सवालही निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, मी सरकारला घाबरू नका, असे आवाहन करतो. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असा राज्यासह देशभरात नियम आहे, असंही निरुपम म्हणाले.

हे देखील पाहा

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला होता. ४ मेपर्यंत भोंगे उतरले नाहीतर भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला होता. मनसेच्या भोंगा मुद्दाला भाजपने पाठिंबा दिला आहे. ४ मे दिवशी मनसेने राज्यात आंदोलन सुरु केलं होतं. यापार्श्वभूमीवर राज्यातील मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं होतं.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.