गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये मतदानासाठी सुट्टी

गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Government On Gujarat Elections 2022
Maharashtra Government On Gujarat Elections 2022SAAM TV

Maharashtra Government On Gujarat Elections 2022 : गुजरात निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात सीमेजवळ राहणाऱ्या गुजराती नागरिकांना मतदानासाठी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधी सरकारी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२२ आणि ५ डिसेंबर २०२२ या दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जांगासाठी, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होईल. गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुजरात सीमेजवळील महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या गुजराती नागरिकांना मतदानासाठी एक दिवस भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Government On Gujarat Elections 2022
Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

यात पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो. गुजरातमध्ये मतदार यादीत नाव असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत राहणाऱ्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने यासंबंधी अध्यादेश जारी केला आहे. सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांतील कर्मचारी आणि उद्योगांशी संबंधित नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Gujarat Elections 2022)

Maharashtra Government On Gujarat Elections 2022
Sanjay Raut : संजय राऊतांना मध्यरात्री राहुल गांधींचा फोन; नेमकी काय चर्चा झाली?

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार

पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होणार

दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान

पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर रोजी मतदान

दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी मतदान

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com