महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं; वाचा कुणाकडे कोणती जबाबदारी?

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं; वाचा कुणाकडे कोणती जबाबदारी?
महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं; वाचा कुणाकडे कोणती जबाबदारी?Saam Tv

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात काल 43 नेत्यांनी शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी जाहिर झाली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता 10 मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. तर मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रातून संजय धोत्रे Sanjay Dhotre आणि प्रकाश जावडेकर Prakash Javdekar यांची हकालपट्टी केली आहे. बुधवारी झालेल्या विस्तारात मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये नारायण राणे Naryan Rane, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. बुधवारी राज्याला १ केंद्रीय मंत्रिपद, तर ३ राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. कपिल पाटील Kapil Patil वगळता मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले अन्य तिघे प्रथमच संसदेत आले आहेत.

हे देखील पहा -

राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा,उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं; वाचा कुणाकडे कोणती जबाबदारी?
प्रकृती खालावल्याने एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर राहणार का?

कुणाकडे कोणती जबाबदारी?

नितीन गडकरी - रस्ते वाहतूक व महामार्ग, केंद्रीय मंत्री

पियुष गोयल - वस्त्रोद्योग, केंद्रीय मंत्री

नारायण राणे - लघु आणि मध्यम उद्योग, केंद्रीय मंत्री

रामदास आठवले - सामाजिक न्याय, राज्यमंत्रिपद

भागवत कराड - अर्थ राज्यमंत्रिपद

डॉ. भारती पवार - आरोग्य राज्यमंत्री

रावसाहेब दानवे - रेल्वे राज्यमंत्री

कपिल पाटील - पंचायत राज राज्यमंत्री

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com