महाराष्ट्र सुरक्षित, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही : संजय राऊत

कोणाला धक्का लागत असेलतर केंद्र सुरक्षा देण्यास समर्थ असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्र सुरक्षित, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही : संजय राऊत
Sanjay Raut Saam Tv

मुंबई: काल मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेवून धमकीचे पत्र आले असून या पत्रात राज ठाकरेंनाही धमकी आल्याचे म्हटले होते. यावर आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही, अशी प्रतिक्रीय संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

शिवसेना भवनवर अशी धमकीचे पत्रं रोज येत असतात. कोणी कोणाला हात लावत नाही. जर कोणाला धक्का लागत असेलतर केंद्र सुरक्षा देण्यास समर्थ असल्याचा टोलाही बाळा नांदगावकर यांना राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याकडे केंद्राने लक्ष दिले पाहिजे. देशात अनेक विषय आहेत तिकडे लक्ष दिले पाहिजे. श्रीलंकेत जशी परिस्थिती सुरु आहे, तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ शकते. त्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांनी महागाईकडे लक्ष दिले पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले. पाकिस्तानही पूर्वी आपला होता, पाकिस्तानातील हिंदु आपलाच आहे, याचा अगोदर विचार करायला पाहिजे, देशातीलच वेगळे विषय काढून महागाईवरुन दुर्लक्ष करु नका, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

लोकांना नोकऱ्या नाहीत. काही दिवस हे वादग्रस्त विषय बाजूला ठेवून महत्वाच्या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. श्रीलंकेसारखी परिस्थिती होऊ नये यासाठी लक्ष दिले पाहिजे, श्रीलंकेतही अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले होते. आता परिस्थिती काय आहे, ते पाहा, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

राजद्रोह कलमावर बोलताना राऊत म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. या कलमाचा वापर चुकीचा होत होता. अनेक दिवसापासून या कलमाबाबत अनेकजण बोलले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.