मातोश्री आमचं मंदिर, आमचा देव मंदिरातच.....; उद्धव ठाकरेंबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.
Uddhav Thackeray, Rajesh Srirasagar
Uddhav Thackeray, Rajesh SrirasagarSaam TvNews

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांनी बंड करत महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या आमदारांसह, नेत्यांनीही बंड केले होते. यात कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही बंड करत गुवाहाटीला गेले होते. राजेश क्षीरसागर यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल भावना व्यक्त केली.

आज राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आहेत. चंद्रकांत पाटील माझे जुने सहकारी आहेत. आमच्यात २०१४ ते २०१९ मध्ये काही मतभेद झाले होते, त्यामुळे आज मी मनमोकळे करायला भेटलो चंद्रकांत पाटील यांना भेटायला आलो होतो. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.

Uddhav Thackeray, Rajesh Srirasagar
Rain Update Live : मुंबई, पुण्याला ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे आणि कशी आहे परिस्थिती? क्लिक करा

'दर १० ते १५ वर्षाने शिवसेनेत अशी परिस्थिती येते. ती कशामुळे येते याचा विचार व्हायला पाहिजे. शिवसेनेचे काही मंत्री काम करत नव्हते. जे घडले ते घडायला नको होते. उद्धव ठाकरे यांना २०१६ ते १७ पासून मुख्यमंत्री म्हणून दाखवले गेले. पण, आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होते. त्याला बाहेर काढले. मला खात्री आहे की राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत.'असंही राजेश क्षीरसागर (Rajesh Srirasagar) म्हणाले.

Uddhav Thackeray, Rajesh Srirasagar
देशात कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या, 28 मृत्यू

'जी कामे शिवसेनेच्या आमदारांची व्हायची ती झाली नव्हती म्हणून, आम्ही गेलो. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना निधी दिला. त्यांनी मदत केली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मंत्री पदाबाबत बोलताना श्रीरसागर म्हणाले, आताची अडीच वर्षे महत्वाची आहेत. त्यामुळे जी व्यक्ती उपयुक्त आहेत त्यांचा नक्की विचार करतील. २०१४ पासून दरवेळी माझे नाव आणि फोटो मंत्री मंडळात समावेश होईल, असे होते मात्र मला कधीच स्थान दिले नाही. यावेळी मला संधी दिली तर मला आनंद होईल, असंही क्षीरसागर (Rajesh Srirasagar) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com