भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

उद्या विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे.
भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा
Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News, Saam Tv

मुंबई: उद्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक (Election) होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीची चर्चा राज्यात सुरू आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. उद्याच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल हे आम्ही पाहत आहे, असंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News,
जेव्हा बच्चू कडूंना चहाची तलप येते...टपरीवर घेतला चहा बिस्किटांचा आस्वाद

तिनही पक्षांचे आमदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची (NCP) आता बैठक सुरू होणार आहे. राष्ट्रवादीने व्हीप जारी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही, मतदार संघातील विकास कामावर चर्चा झाली, असंही पाटील म्हणाले.

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, यावर आता बोलण जास्त महत्वाच ठरणार नाही. घोड मैदान जास्त दूर नाही, उद्याच काय आहे ते समोर येईल,

देवेंद्र फडणवीसांनी केले भाजप आमदारांना मार्गदर्शन

विधान परिषदेच्या १० जागेसाठी उद्या सोमवार २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप या दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी व भाजपने (BJP) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने आमदारांची बैठक मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. 'निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही', असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. 'निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही', असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिला.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com