
भूषण शिंदे
मुंबई: भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra legislative council election) पाच आणि अपक्ष एक अशा सहा उमेदवारांची घोषणा केली. त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही नवखे आले की त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे खडसे म्हणाले. (Eknath Khadse Latest Marathi News)
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत सर्वच पक्षांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देऊन मोठा धक्का दिला आहे.
याबाबत काल, बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आम्ही पंकजांना उमेदवारी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले, असे ते म्हणाले होते. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर आरोप केले आहेत. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही पंकजा यांना उमेदवारी न देण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
मुंडे आणि महाजन या दोन्ही कुटुंबांनी आपले आयुष्य भाजपसाठी खर्ची घातले. परंतु, तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. आज कोणीही नवखे आली की, त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात आहे. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे खडसे म्हणाले.
मुंडे आणि महाजन यांनी या सर्वांना आणि पक्षाला मोठे केले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते खूप अनुभवी आहेत. कदाचित म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल, असा टोलाही खडसेंनी लगावला.
यापूर्वीच्या काळात समन्वयाने आणि सामोपचारानं उमेदवारी देऊन हे प्रश्न निकाली लावले जायचे. मात्र आता जाणूनबुजून घोडेबाजाराला प्राधान्य देऊन जे राजकारण केले जात आहे. ते अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही खडसे यांनी यावेळी दिली.
अडचणीत असताना शरद पवारांनी आधार दिला- खडसे
मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा राजकीय प्रवास झाला. माझे राजकीय जीवन अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी मला जो आधार दिला, माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
माझे अर्धे आयुष्य हे भाजपला मोठे करण्यात गेले आणि आता पुढचे आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे करण्यात जाईल, असे खडसे म्हणाले.
Edited By - Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.