विधान परिषद निवडणूक: शिवसेना हायअलर्टवर, दगाफटका केला तर कारवाई होणार

२० जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे.
विधान परिषद निवडणूक: शिवसेना हायअलर्टवर, दगाफटका केला तर कारवाई होणार
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक लागली आहे. सुरुवातील ही निवडणूक (Election) बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. २० जून रोजी या निवडणूका होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर झालेल्या पराभवामुळे शिवसेनेने आता कडक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने (Shivsena) आता आपल्या आमदारांना हायअलर्टवर ठेवले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणतीही चूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. ते कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray
सावधान! सडक्या फळांच्या ज्यूसची विक्री; धक्कादायक VIDEO आला समोर

यावेळी जर कोणत्या आमदाराने मतदान करताना चूक केली, तर कडक कारवाई करणार असल्याचे सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. एखाद्या नेत्याने दगाफटका केल्यास कारवाई होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले होते, त्यांनी ही चूक जाणीवपूर्वक केली होती का, अनावधानाने झाली होती, याची चौकशी करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एका मतामुळे पराभव झाला आहे, त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) हायअलर्टवर आहे.

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी आता विधान परिषदेसाठी अलर्टवर आहेत. काँग्रेस नेत्यांची आणि आमदारांची आज बैठक होणार आहे. ही बैठक विधान भवनाऐवजी हॉटेल फोर सिझनमध्ये होणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि मंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

Uddhav Thackeray
Sanjay Biyani: संजय बियाणी वारसदार प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट, 'त्या' महिलेने...

आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती, राष्ट्रवादीच्या (NCP) अनिल पाटील यांनी दिली. 'सर्व आमदारांना यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीत अपक्ष, समर्थक आमदार उपस्थित असतील, पक्षाचे गटनेते आणि नेते मतांबाबत आमदारांना सूचना करतील. भाजप कशाप्रकारे आमदारांवर दबाव टाकतात हे स्वतः मी पाहिलेले आहे, कारण मी २५ वर्षे भाजपमध्ये होतो. माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे की, तुम्ही भाजपचे आमदार सांभाळा कारण एकनाथ खडसे यांना नेमक ते काय करतात हे माहिती आहे, असंही राष्ट्रवादीचे अनिल पाटील म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com