Maharashtra Legislative Council Elections: राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता.
Maharashtra Legislative Council Elections: राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले
Maharashtra Legislative Council ElectionsSaam TV

मुंबई: काँग्रेसने (Congress) भाजपच्या दोन मतांवर आक्षेप नोंदवला होता, या आक्षेपावर आता राज्या निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आता या संदर्भात केंद्रीय निवडूक आयोगाला लेखी कळवले आहे, अशी माहिती मिळत आहे. या संदर्भात आता काँग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.

आज विधानपरिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीवरुन (Election) महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांविरोधात आक्षेप नोंदवला होता. या संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला तक्रार दिली होती. या संदर्भात आता निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. (Maharashtra Legislative Council Elections)

Maharashtra Legislative Council Elections
Maharashtra Legislative Council Elections: काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला घेतला आक्षेप

काँग्रेसने भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली, असा आरोप काँग्रेसने (Congress) भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. गुप्त मतदान असताना दुसऱ्यांची मदत घेतल्याने ही हरकत घेतली.

काँग्रेसने भाजपच्या (BJP) दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना अतुल लोंढे म्हणाले, हे गुप्त मतदान आहे, यात कोणाचीही मदत घेता येत नाही. हे अशा पद्धतीने मतदान करणे चुकीचे आहे. नियमाच्या बाहेर जावून मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची दोन मत रद्द झाली पाहिजेत. त्यांनी आयोगाकडे काही तशी मदत मागितली होती का हे पाहावे लागणार आहे.

मत पत्रिका वाचून त्यावर सही करावी लागते आणि मत देताना ते गुप्त करावे लागते, हे मत त्यांनी दाखवून केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे, त्यामुळे यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी एक, एक मत हे महत्वाचे आहेत.

या संदर्भात बोलताना भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले, त्यांनी कशा पद्धतीने मतदान केले हे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. काँग्रेस हा एक वेगळ्या मानसिकतेचा आहे आहे, त्यामुळे त्यांनी हा आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यावर आमचा विश्वास आहे, असंही भातखळकर म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com