विधान परिषद निवडणुक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीची चाचपणी सुरु...

मुंबईत काँग्रेसचे नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीची चाचपणी सुरु...
विधान परिषद निवडणुक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीची चाचपणी सुरु...Saam Tv

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: राज्यात विधानपरिषदेच्या सहा जगांसाठी निवडणुक (Maharashtra Legislative Council Elections) होणार आहे. ही निवडणुक बिनविरोध (unopposed) व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रयत्न सुरु आहे. याबाबत कॉंग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shivsena) महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. यात कुठे उमेदवार मागे घेता येतील ह्याची चाचपणी करण्यात आली. मुंबईत सुरेश कोपरकर (Suresh Koparkar) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, ते काँग्रेसचे नेते असल्याने त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणुकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Legislative Council elections will be unopposed? Mahavikas Aghadi trial begins)

हे देखील पहा -

असा असेल निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशीम आणि नागपूर या पाच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबरला उमेद्वारांकडून अर्ज दाखल केले गेले, तर २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी झाली. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेंबर असून, १० डिसेंबर रोजी (सकाळी ८ ते सायं. ४) मतदान पार पडेल तर १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झालेल्या जागांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपत असून त्यात रामदास कदम आणि भाई जगताप (मुंबईतील २ जागा), सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अमरीश पटेल (धुळे- नंदुरबार), गोपीकिसन बाजोरिया (अकोला-बुलढाणा-वाशीम), गिरीशचंद्र व्यास (नागपूर) यांचा समावेश आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com