राज्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस; महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून?

आज राज्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस बरसला.
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon UpdateSaam Tv

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनची (Monsoon) प्रतिक्षा लागली आहे. या वर्षी मान्सून वेळे अगोदरच राज्यात दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, पण अजुनही मान्सून दाखल झालेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) खरीपाची तयारी केली आहे, पण मान्सूनच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत. आज राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस बरसला आहे. यवतमाळ, नाशिक, नागपूर, बुलडाणासह खेडमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस बरसला आहे.

पुढच्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक आणखी काही भागात मान्सूनसाठी (Monsoon) परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासाच मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (Maharashtra Monsoon Update)

Maharashtra Monsoon Update
धक्कादायक! आईने गेम खेळण्यास मोबाईल दिला नाही; १६ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर मारली उडी

आज राज्यात या ठिकाणी बरसला पाऊस

यवतमाळ- आज यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोराच होता. या तडाख्यातच दुपारी वादळ वाऱ्यासह जोरदार पावासाने एन्ट्री केली. जवळपास तीस मिनिट पाऊस बरसला.

वाशिम- वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान या मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतिला वेग आला आहे.

नागपूर- नागपूरच्या काही भागात रिमझिम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासून कडक उन्ह मात्र दुपार नंतर पावसाचे वातावरण झाले.

बुलढाणा- बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील व परिसरातील, हिवरा आश्रम, बेलगाव, जानेफळ या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह एक तास मुसळधार पाऊस बरसला. (Maharashtra Monsoon Update)

रायगड - ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये पावसाची हजेरी. दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. रायगडमधील माणगाव, महाड, गोरेगाव भागात पाऊसाने जोरदार बॅटींग केली.

Maharashtra Monsoon Update
Rajya Sabha Election :देशमुख-मलिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळला; किरीट सोमय्या म्हणाले...

पुणे- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मान्सूनपूर्व पाऊस आज बरसला. मान्सूनपूर्व पाऊसाचे कोकणातील काही भागातही आगमन झाले. आज कोकणातील काही भागात तुरळक पाऊस पडला.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

पुढ्या ४८ तासात मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Monsoon Update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com