Monsoon Updates : मान्सूनचे महाराष्ट्रात कधी होणार आगमन?; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

या वर्षी मान्सूनचे (Monsoon) महाराष्ट्रात वेळेअगोदर आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
Monsoon News Updates in maharashtra
Monsoon News Updates in maharashtraSaam Tv

पुणे: या वर्षी मान्सूनचे (Monsoon) महाराष्ट्रात वेळेअगोदर आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता, पण अजुनही राज्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतीची कामे करुन ठेवली आहेत, पण पावसाअभावी पेरणी केलेली नाही. हवामान विभागाने काल ' पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Monsoon Latest Update)

Monsoon News Updates in maharashtra
देहूमध्ये PM मोदी, फडणवीसांचं भाषण; अजित पवारांना डावललं?

पश्चिम किनार्‍यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली, येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. येत्या ४ ते ५ दिवसांचे इशारे जवळपास सारखेच असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Monsoon News Updates in maharashtra
मुख्यमंत्र्यांच्या वाहनातून आदित्य ठाकरेंना उतरवले; उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणेवर भडकले

मान्सूनचे महाराष्ट्रात कधी होणार आगमन?

गेल्या काही दिवसापासून मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची वाट शेतकरी पाहत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकला आहे. तसेच तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात सोमवारी पाऊस दाखल झाला आहे. यामुळे आता येत्या ४८ तासांमध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भातील काही भागांमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Latest Update)

गेल्या दोन वर्षापासून मान्सूनचे वेळेत आगमन होत आहे, पण या वर्षी अजुनही पूर्ण क्षमतेने आगमन झालेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अजुनही पेरमी केलेली नाही. राज्य सरकारनेही पेरणीसाठी शेतकऱ्यांनी गडबड करु नये, पाऊसाला पूर्ण क्षमतेने सुरूवात झाल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. (Monsoon Latest Update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com