महाराष्ट्र बंदचा मुंबईत उडाला फज्जा: अतुल भातखळकर

महाभकास आघाडीने लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदचा आज पुरेपूर फज्जा उडाला
महाराष्ट्र बंदचा मुंबईत उडाला फज्जा: अतुल भातखळकर
महाराष्ट्र बंदचा मुंबईत उडाला फज्जा: अतुल भातखळकररामनाथ दवणे

मुंबई : महाभकास आघाडीने लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदचा आज पुरेपूर फज्जा उडाला, लोकांनी हा बंद अयशस्वी केला असून कांदिवली आणि मालाड येथील दुकानदारांना पोलिसांच्या मदतीने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगणाऱ्या शिवसेनेचा प्रयत्न आ. अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीकडून हाणून पाडण्यात आला आहे.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिले आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकरी, एसटी कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करत असताना लखीमपूरच्या नावाने नक्राश्रू ढाळणाऱ्या भकास आघाडीचा मनसुबा जनतेने ओळखला आणि आजचा बंद पूर्णपणे उधळून लावला आहे. लोकांचा पाठींबा नसल्याने स्वतः पोलिस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत रस्त्यावर उतरून बंद राबवत असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसले आहे. मागील २ वर्षे लॉकडाउनच्या नावाखाली महाराष्ट्र बंद ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सरकार पुरस्कृत बंद पुकारून आपला नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध केला आहे.

महाराष्ट्र बंदचा मुंबईत उडाला फज्जा: अतुल भातखळकर
खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; या काळात तेलाचे भाव होतील कमी?

पोलीस संरक्षणात अनेक ठिकाणी खासगी वाहने, बेस्ट बसची तोडफोड देखील करण्यात आली. पोलीस बळाचा वापर करून केलेल्या या बंद दरम्यान सर्वसामान्यांचे झालेले नुकसान सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या खिशातून भरून काढावे, यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंद दरम्यान सरकार आणि पोलिसांच्या दादागिरी विरोधात रस्त्यावर उतरून व्यापारी आणि दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी हिम्मत देणाऱ्या मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक देखील यावेळी त्यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.