Pune: मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर; यंदा पुण्यात होणार 'राज'गर्जना...

Maharashtra Navnirman Sena Latest News: स्वारगेट येथील गणेश कला-क्रिडा केंद्र याठिकाणी हा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
Maharashtra Navnirman Sena's 16th anniversary is Happening In Pune, What Will Say Raj Thackeray?
Maharashtra Navnirman Sena's 16th anniversary is Happening In Pune, What Will Say Raj Thackeray?Twitter/@mnspunecity

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदा सोळावा वर्धापन दिन संपन्न होतोय. विशेष म्हणजे मनसेचा यंदाचा वर्धापन दिन हा मुंबई, नवी मुंबई किंवा ठाण्यात होत नसून थेट पुण्यात होतोय. त्यामुळे मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन (Maharashtra Navnirman Sena's 16th anniversary) दिन हा पुण्यात होतोय. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी पुण्यातील मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला-क्रिडा केंद्र याठिकाणी हा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष लागलेलं आहे. (Maharashtra Navnirman Sena's 16th anniversary is Happening In Pune, What Will Say Raj Thackeray?)

हे देखील पहा -

मुंबईसह पुण्यातही यंदा महापालिकांच्या निवडणुका (Municipal Corporation Elections 2022) होणार आहेत. यावेळी मनसेनं पुण्यावर जास्त लक्ष दिल्याचं दिसून येतंं. आगामी महापालिका निवडणुकासाठी मनसे-भाजप युतीबाबतही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत मनसेचे केवळ दोन नगरसेवक आहेत. अशात मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पुण्यात मनसेला मोठी खिंडार पडली आहे. त्यामुळे पुण्यात पक्षाच्या संघटनाकत्मक बांधणीसाठीही राज ठाकरे प्रयत्न करणार आहे.

Maharashtra Navnirman Sena's 16th anniversary is Happening In Pune, What Will Say Raj Thackeray?
Nawab Malik Resign: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा मोर्चा

आजच्या सोळाव्या वर्धापन दिनी राज ठाकरे राज्यातील इतर घडामोडींबद्दल देखील बोलण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरली ईडीची कारवाई असो, मंत्र्यांना झालेली अटक असो यासह देशातील पाच राज्यांतील निवडणुका, मनसे-भाजप युती, पक्षबांधणी, पक्षप्रवेश अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे प्रकाश टाकतील. त्यामुळे यंदा राज ठाकरे पुण्यात कोणती राजगर्जना करणार याकडे सर्वांचचं लक्ष लागले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com